मुंबई,दि.१४(punetoday9news):- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूका लढण्यासोबतच केलेल्या विपरित वक्तव्यांमुळे आघाडीत सर्व काही सुरळीत चालू नसल्याचे विरोधकांनी दाखवून दिले. तसेच राज्य सरकार डळमळीत असल्याचे आरोपही झाले.
त्यातच पटोलेंनी माझ्यावर आघाडीतीलच प्रमुख नेते पाळत ठेवत असल्याचे नावासहित केलेले वक्तव्य ही सोशल मिडिया वर प्रचंड वायरल झाल्याने या बाबतीत शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे .
शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली . यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे . तुम्ही वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा . आम्हालाही तयारीला लागता येईल असे ते म्हणाले . जर दिल्लीवरून ठरले असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसेही सांगा , असे शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे .
त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय घडामोडी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed