अहमदनगर, दि. १५( punetoday9news):- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना गुप्तधन सापडले आहे. हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची नाणी सापडली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहेत.
सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची बातमी गावात पसरताच बेलापूर येथील राजेश खटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला.
माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची विनंती या अर्जात केली होती.
हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची 11 किलो 6 ग्रॅम वजनाची 1 हजार 20 नाणी सापडले आहेत. याची किंमत अंदाजे सुमारे 8 लाख रुपये आहे.
जिल्हाधिकारी भोसले यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित ठिकाणी जाऊन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून, बुधवारी पाटील यांनी गावात येऊन गुप्तधनाचा पंचनामा केला व त्या पंचनामात त्यांना 11 किलो 6 ग्रॅम वजनाची एकूण 1 हजार 20 नाणी आढळून आली असून हे गुप्तधन पाटील यांनी ताब्यात घेतले आहे.
Comments are closed