एकाच वेळी विद्यार्थी दर वर्षी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट वर जातात हे माहिती असूनही त्या संदर्भातील उपयोजना का करण्यात आल्या नाहीत असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.
पुणे,दि.१६( punetoday9news):- शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या ऑनलाइन तपासणीसाठी मोबाईल कम्प्युटर वर निकालाची वाट पाहत होते मात्र प्रत्यक्षात दहावीच्या बोर्डाची वेबसाईटच काम करत नसल्याने विद्यार्थी व पालक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
दुपारी एक वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कित्येक पालक हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या निकालाच्या संदर्भातील वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात मोठी चिंतेची लाट निर्माण झाली आहे. निकालाच्या या गोंधळाने विद्यार्थी मात्र पुरते गोंधळून गेले आहेत.
Comments are closed