पिंपळे गुरव,दि.१७( punetoday9news):- उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत महिला उत्कर्ष समिती ही वर्षभरापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याचे काम करीत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोकण या ठिकाणी महिला उत्कर्ष समिती कार्यरत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातही महिला उत्कर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.


महिला उत्कर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण महराष्ट्र राज्‍यातील महिलांना न्याय मिळण्याकरीता हि समिती प्रयत्न करीत असते. तसेच महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्‍यात व ४५ पोलीस घटकांच्‍या मुख्‍यालयात महिला सुरक्षा समिती स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. या समितीव्‍दारे संघर्षगस्‍त महिलांना कायदे विषयक सहाय्यता मिळवून देण्‍याकरिता पोलीसांच्‍या मदतीने पुर्ण सहकार्य करण्‍यात येते. या समितीमध्‍ये महिला डॉक्‍टर, महिला वकील, महिला प्राध्‍यापक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्‍या इत्‍यांदीचा समावेश करण्‍यात आला आहे. महिलांना न्याय मिळावा तसेच घटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सांगवी येथे झालेल्या बैठकीत उत्कर्ष समितिचे संस्थापक डॉ. अशोक म्हेत्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व समितीच्या सदस्यांना अपघाती विमा पॉलिसी देण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा योगिता टूंगलाईट, उपाध्यक्षा हर्षदा गडपोल, सचिव निशा जाधव, उपसचिव ज्योती गायकवाड, मालती कांबळे, डॉ. वैभव पाटील, शैलेश ठाकूर, राम जाधव, गणेश कांबळे, आनंद गडपोल, सुमित टूंगलाईट आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!