भोसरी,दि.१७( punetoday9news):- भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीतून टेन्शन घेण्यापेक्षा पर्यावरण पूरक सीएनजी/पेट्रोल टीव्हीएस किंग कार्गो उत्तम पर्याय असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
लोकांना आता सीएनजीवर चालणाऱ्या वाहने आवडू लागली आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गाड्या जास्त मायलेज देतात. तसेच पेट्रोल – डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमत कमी सुद्धा आहे. जर तुम्हाला CNG कार्गो गाडी खरेदी करायचा विचार मनात आला असेल तर या टीव्हीएस कार्गो किंग मालवाहतूक रिक्षा सर्वात किफायतशीर असल्याचे टीव्हीएस कंपनीचे अधिकारी शिवानंद लामधाडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरात अद्यावत शोरूम आणि सेल्स व सर्व्हिस देणारे ‘सार्थक ऑटोच्या’ शोरूम मध्ये टीव्हीएस कंपनीने मालवाहतुकीसाठी तयार केलेली ‘टीव्हीएस किंग कार्गो’ या ऑटो रिक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
प्रसंगी आमदार महेश लांडगे, ह भ प कैलास महाराज येवले, नगरसेविका योगिता नागरगोजे, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, टीव्हीएसचे अधिकारी शिवानंद लामधाडे, सौरव गोराई, नितेश शेट्टी तसेच राजेश सस्ते, कपिल कुमार, रस्मी सिंग, सार्थक ऑटोचे संचालक सुनील बर्गे सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक उपस्थित होते. कोरोनामुळे मर्यादित संख्येत कार्यक्रम घेण्यात आला.
शंकर देवरे यांनी प्रास्ताविक केले, सुनील बर्गे त्यांनी मान्यवरांचा सत्कार केला व शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.
Comments are closed