एक्स , वाय आणि झेड वर्ग शहरांनुसार वर्गीकरण. 

दिल्ली, दि.१८(punetoday9news):-  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( Dearness allowance , DA ) वाढीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर येत आहे . त्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर सरकारने घरभाडे भत्ता House Rent Allowance ( HRA ) मध्येही बदल करण्यात आला आहे .

यासह ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये एचआरएचीही वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे . सरकारच्या आदेशानुसार एचआरए वाढविण्यात येणार असून डीएने २५ टक्केचा टप्पा पार केला आहे . आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शहरानुसार २७ टक्के , १८ टक्के आणि ९ टक्के घरभाडे भत्ता मिळणार असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार सांगितले जात आहे . हे वर्गीकरण एक्स , वाय आणि झेड वर्ग शहरांनुसार आहे .

म्हणजेच एक्स क्लास सिटीमध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्याला आता अधिक एचआरए मिळणार आहे . यानंतर वाय वर्ग आणि त्यानंतर झेड वर्गाला देखील हा भत्ता देण्यात येणार आहे . सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारने एचआरएची पद्धत बदलली होती . यात एक्स , वाय व झेडच्या तीन श्रेणी तयार केल्या होत्या . त्यानुसार २४ टक्के , १८ टक्के आणि ९ टक्के एचआरए घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता . असेही सांगितले जाते की , जेव्हा डीए २५ टक्के पार करेल तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल . अलाहाबाद एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स असोसिएशनचे सहायक सरचिटणीस हरीशंकर तिवारी यांच्या मते , एक्स श्रेणी अव्वल असून यामध्ये ५० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश आहे . येथे कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता २७ टक्के एचआरए मिळणार आहेत . त्याचबरोबर वाय श्रेणी शहरांमध्ये एचआरए १८ टक्के असणार तर झेड श्रेणीत एचआरए ९ टक्के असणार आहे .

यासह शहराचे अपग्रेडेशन देखील एचआरए अंतर्गत केले जाते . जसे की जर एखाद्या शहराची लोकसंख्या ५ लाखांची लोकसंख्या पार केली असेल तर ती झेड श्रेणीतून वाय श्रेणीमध्ये श्रेणीसुधारित होते . म्हणजेच ९ टक्क्यांऐवजी १८ टक्के एचआरए तेथे मिळणार असल्याचे हरीशंकर तिवारी यांनी सांगितले .

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!