पिंपळे गुरव,दि.२३ (punetoday9news) :-  पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने विविध उपक्रम राबवले असून यापुढे ही नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी दिली.

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच ई सेवा उपक्रम राबविण्यात येणार असून, याअंतर्गत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहेत. तसेच उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट आदी कागदपत्रेही मोफत काढून देण्यात येणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप,अतुल दादा शितोळे,माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, युवा नेते तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, तृप्तीताई जवळकर, शहर उपाध्यक्षा उज्ज्वलाताई ढोरे, माजी नगरसेविका सुषमाताई तनपुरे ,पुनमताई जगताप, अश्विनीताई जगताप, ​विलासतात्या जगताप , जनार्धन जगताप , रोहिदास जगताप, मधुकर रणपिसे, हनुमंत भागुजी जगताप , अशोक जगताप , दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, किसन जगताप, ज्ञानेश्वर जगताप ,संदीप नलावडे ,संतोष देवकर, कैलास जगताप ,सोमनाथ जगताप, गणेश काशिद ,आदेश जगताप ,अतुल काशीद , गणेश जगताप ,नयन अहिरे, राजु कांबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते .

​शामभाऊ जगताप युवा मंचाचे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा माजी अध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की आपली सामाजिक जबाबदारी म्हणून अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

 


Comments are closed

error: Content is protected !!