पुणे, दि. २३( punetoday9news):-

आंबेगाव तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 17.60 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
1. मौजे कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळुन मुख्य रस्ता बंद झाला असता, सदयस्थितीत रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. पावसाचा जोर कमी झाला असून परिस्थिती सामान्य आहे.
2. कोणत्याही प्रकारची मनुष्य व पशु हानी झालेली नाही.

भोर तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 41.25 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
1.महाड महामार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला होता, परंतू काल मध्यरात्री पुन्हा दरड कोसल्यामुळे जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
2. साळुंगण या ठिकाणी डोंगराचा काही भाग वाहून आलेला असून त्यामुळे स्मशानभूमी पुर्णपणे त्याखाली गाडली गेली असून मातीचा ढिगारा दोन जेसीबीच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काम सुरू आहे.
3. कनकरवाडी गावालगतचा ओढा तुंबल्याने व पावसाचा जोर असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहे.

मावळ तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 171.34 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
रस्ते अडथळे दूर करण्यात आले आहेत, कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. पाऊस सदयस्थितीत रिमझीम सुरू आहे.
खेड तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 14.78 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
1. आरळा कळमोडी धरण 100% भरले असून सदयस्थितीत पावसाचा जोर ओसरला आहे.
2. मौजे नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटलेल्या याचा पंचनामे कृषी अधिकारी करत आहेत. तर परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

हवेली तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 12.20 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
1. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.
2. आज दुपारी 1 वाजता 3412 क्यूसेसने खडकवासला धरणातून विसर्ग केलेला आहे.

मुळशी तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 166.33 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
मोजे माले येथील परिस्थिती सामान्य असून, मदतकार्य पोहचली असून इतर परिस्थिती सामान्य आहे.
वेल्हा तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 139 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
मौजे जाधववाडी येथे भटटी वाघदरा ते पासली दे दरम्यान भुस्खलन होऊन रस्ता बंद होता. तो पूर्ववत करण्यात आला आहे.
जिल्हयातील या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!