मुंबई,दि.२४(punetoday9news):- काही महिन्यांपूर्वी शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केल्यानंतर आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत. शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत परिपत्रक काढण्यात आले आहे.
१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील दूरध्वनीचा ( Landline ) वापर करावा .
२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा .
३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा . तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी .
४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे , बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये .
५. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा ( Text Message ) शक्यतो वापर करावा . तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा .
६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे .
७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे .
८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी , कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत .
९ . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent / vibrate mode वर ठेवावा .
१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे , संदेश तपासणे , ear piece / ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात .
११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये .
Comments are closed