पुणे, दि .२६( punetoday9news):- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात जास्त पाऊस झाल्याने व नदीत पाणी सोडल्याने , धरणातून पाईप लाईन मधून पिण्यासाठी पाणी घेताना त्यामधील पाण्याचा गढूळपणा वाढलेला आहे .
त्यामुळे सदरचे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करण्यात येत असून , पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे . तरी नागरिकांनी पाणी उकळून , गाळून , थंड करुन घ्यावे .असे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed