पिपरी,दि.२७( punetoday9news):- संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अंध , दिव्यांग, विधवा , जेष्ठ नागरिकांना मिळत असतो मात्र त्यासाठी लागणारी कागद पत्रे उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला मिळण्यास ज्यास्त वेळ लागत आहेत. ती लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काही प्रतिज्ञापत्र तहसीलदार कार्यालय येथील सुविधा केंद्रात उपलब्ध नसतात ती सुध्दा तहसीलदार कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात यावीत. जेणेकरून अंध , दिव्यांग, विधवा व जेष्ठ नागरिकांना त्रास न होता एकाच ठिकाणी सर्व दाखले व प्रतिज्ञापत्र मिळतील त्यांचा वेळ व हेलपाटे वाचतील.

या संदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पिंपरी विधान सभा अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी अप्पर तहसील कार्यालय आकुर्डी, आमदार आण्णा बनसोडे यांना निवेदन दिले. तसेच अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यात आली.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!