मुंबई,दि.२८( punetoday9news):- राज्यपाल पदावर असतानाही राजकीय चर्चेत राहणारे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी ओळखले जावू लागले आहेत. अशी टीका सामान्य नागरिकांतूनही होत आहे. सरकार स्थापनेपासून १२आमदार निवडीपर्यत राज्यपाल नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. 

त्यातच त्यांनी नेहरूंवरील वक्तव्याने ते पुन्हा काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून भगतसिंह कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात . राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो . त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत.

२७ जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती . नेहरू यांच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचे नुकसान झाल्याचे कोश्यारी यांनी म्हटले होते . पण या वक्तव्यावरून नंतर वाद निर्माण झाला . ” हे विधान भारताचा अवमान करणारे असल्याचे सांगत कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी , ” अशी मागणी पटोले यांनी केली आहे .

कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे , असेही पटोले म्हणाले . राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!