राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला होता .
जवळपास प्रत्येक चहाच्या दुकानात मिळतात सुट्या सिगारेट.
सांगवी , पिंपळे गुरव मधील प्रत्येक चौकात तरुणाईला व्यसनाधीन करण्याची सोय ?
तरुणाईचे भविष्य जळतंय धुरात .
पिंपरी,दि.२८ ( punetoday9news):- महाराष्ट्र राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश सप्टेंबर २०२० मध्येच लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या . त्यानुसार टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येत नाही . विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक आहे. जेणेकरून लहान मुले व्यसनापासून लांब राहतील . मात्र प्रत्यक्षात या नियमाचे पालन होताना दिसून येत नाही.
दुसरीकडे दारू विक्रीबाबतही प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मद्यप्रेमीची मागील दरवाजातून सोय होताना दिसत आहे. मास्क वरील कारवाईत तत्पर असलेले प्रशासन इतर अनधिकृत बाबीकडे डोळेझाक करत असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत.
राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने सरकारकडून सिगारेट बाबत हा आदेश जारी करण्यात आला खरा पण प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी कागदोपत्रीच राहिली असे म्हणावे लागेल . पिंपरी चिंचवड शहरात कित्येक ठिकाणी चहाच्या टपरीवर तुम्हाला राजरोसपणे सुट्या सिगारेट मिळतील व सिगारेट ओढण्यास आडोसाही . अगदी सरकारी कार्यालय असो कि पोलीस स्टेशन ! शेजारीच तुम्हाला एखाद्या टपरीवर , हॉटेल मध्येही सुटी सिगारेट सहज रित्या उपलब्ध होते. मग या हॉटेल , टपरी चालकांना कायद्याचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न हि उपस्थित केला जात आहे.
एकीकडे कोयता भाई सारख्या गँगवर कारवाई करणारे पोलीस या गुंड प्रवृत्ती वाढवणाऱ्या सिगारेट अड्यावर कारवाई का करत नाहीत असा सहज, साधा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो. दापोडी ते पिंपरी हायवेवर तर ठीक-ठिकाणी तुम्हाला असे सिगारेट अड्डे दिसून येतात .अगदी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक, प्रवाश्यांना हा सिगारेट चा धूर दिसतो मात्र तो पोलीस प्रशासनास का दिसत नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच काय तर या चहाच्या टपरीवर, सिगारेट अड्यावर १८ वर्षे खालील मुले-मुलीही सिगारेट चा झुरका घेताना आढळतात . संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन दरम्यान रस्त्याशेजारी , शेल पेट्रोल पंप शेजारी अगदी लॉकडाऊन दरम्यान हि हे अड्डे चालूच होते.
महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत . त्यांनी आपल्या ‘आयर्न मॅन’ उपाधी प्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर भयमुक्त करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कारवाया हि केल्या आहेत त्यामुळे वाढत्या तरुणाच्या व्यसनाधीनतेकडे पाहून ते काही ठळक ठोस कारवाई करणार का ? असेही नागरिक बोलत आहेत.
Comments are closed