● रक्तदान शिबिरात 93 जणांचे रक्तदान.

पिंपरी,दि.२९( punetoday9news):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पिंपरी चिंचवड शहर संघटक सचिन सानप यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर कृष्णानगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 93 लोकांनी रक्तदान केले. तसेच कृष्णानगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. चिखली अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांना खाऊवाटप करण्यात आला. गणपती मंदिर महात्मा फुलेनगरमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सचिन सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, सहसंपर्कप्रमुख इरफा सय्यद ,भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय अल्लाट, नगरसेवक अमित गावडे, जिल्हा संघटक तुषार सहाने, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उद्योजक निलेश नेवाळे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, कुणाल तापकीर, ज्येष्ठ नेते सर्जेराव भोसले, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, दादा नरळे, भोसरी विधानसभा समन्वयक राहुल भोसले, ऋषिकेश जाधव ,संतोष वाळके, युवा नेते राकेश वाकुर्डे, आशाताई भालेकर, अमित शिंदे, विभागप्रमुख सतीश दिसले, सतीश मरळ, राजू भुजबळ, नितीन बोंडे, विकास आघाव, सचिन सारुख, राकेश सानप, राजू भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते आप्पा सायकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, प्रकाश मुंगुरवाडे, सोमनाथ सूर्यवंशी, लक्ष्मण देसाई, संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, शिवानंद चौगुले, यशवंत कन्हेरे, सर्जेराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रदीप सकपाळ, दीपक साळुंखे, राहुल ठाकरे, आकाश पाटील, अजिंक्य भोर, स्वप्निल शिरसाट, स्वप्निल काटे, अमित बिराजदार, स्वप्निल कांबळे, योगेश सानप, निखिल काटे, अरुण चव्हाण, अनुप लांबट, शैलेश शिंदे ,अक्षय इंगळे ,सोनू मुंडे सर्व मित्र परिवार व शिवसेना भोसरी विधानसभा प्रभाग क्र. 11 मधील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी यांनी केले.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!