पिंपरी,दि.२९( punetoday9news ):- देहूगाव येथील “गेथसमन आश्रम” या ठिकाणी वृद्ध निराधार स्त्री पुरुष यांना हक्काचा आधार आश्रमचालक संतोष जॉय यांनी मिळवून दिला आहे. आश्रमातील निराधारांसाठी कपड्यांची गरज लक्षात घेऊन संदीप परंडवाल यांच्या पुढाकाराने दैनंदिन वापरातील चांगले कपडे, ब्लॅंकेट, चादर, शाल इत्यादी वस्तू गोळा करून आश्रमाला देण्यात आले.
विनाअनुदानित तत्वावर हा आश्रम गरजूंची देखभाल करत आहे. येथील आश्रमातील गरजूंची कपड्यांची गरज लक्षात घेऊन संदीप दिवाणराव परंडवाल यांच्या पुढाकाराने “एकतारा सोसायटी देहू” येथे स्त्री-पुरुषांसाठी दैनंदिन वापरातील चांगले कपडे, ब्लॅंकेट, चादर, शाल इत्यादी वस्तू गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला . या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व वस्तू आज “गेथसमन आश्रम” ला भेट देण्यात आल्या.
यावेळी वैभव नारळे, विनोद परंडवाल, तुकाराम बिराजदार, प्रशांत लंगर, ललित खैरनार, अमृता परंडवाल, सोनाली वाघे, उर्मिला बिराजदार, वैशाली लंगर आदी सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
संदीप परंडवाल हे भाजपा ओबीसी शहर अध्यक्ष असून अनेक सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रमात हिरीरीने सहभागी असतात. आश्रमाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
Comments are closed