साेडण्यात येणारा विसर्ग

विध्दुत जणित्रा द्वारे १४०० क्युसेक्स
व सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स
एकुण =३५०० क्युसेक्स

 

पिंपरी,दि.२९ (punetoday9news ) :- पवना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने पवना धरण ८५ % भरले आहे तसेच धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे धोका पाहता धरणाच्या सांडव्यावरुन सायंकाळी ४.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .
वरुण राजा व पवनामाई यांच्या कृपेने पवना धरणात ८५ % पाणी साठा झालेला असुन हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे
प्रमाण वाढलेले आहे  व त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे.

धरणा मध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज सायंकाळी ४.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .
तरी पवना धरणाच्या खालील बाजुसनदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे .जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!