आता, “फुकटचा” तोरा मिरवणाऱ्या “भुरट्या” शेठ लोकांचा… ‘जाळ’ अन् ‘धुर’ तर निघणारच ना…ओsss शेठ !!

पिंपरी,दि.३० ( punetoday9news ):-  दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणारे, उधारी न देणारे, पैसे परत न करणारे, फुकट तोरा मिरवत सुसाट फिरणाऱ्या भुरट्या शेठ लोकांना लगाम घालण्यासाठी “The Rising Stars Film Production ” घेऊन आले आहेत… ‘ओsss शेठ….या पाहटं पाहटं..!’ हे नवीन गाणं सर्वांच्या भेटीला. मराठीतील अभिनय, चित्रपट तसेच गीत, संगीत क्षेत्र हे चांगलेच व्यापक आहे. येथे कधी कोण कशाची निर्मिती करेल हे सांगता येत नाही. आजच्या वस्तुस्थितीला लक्षात घेऊन The Rising Stars Film Production ने निर्मित केलेल्या ‘ओsss शेठ….या पाहटं पाहटं’ या गाण्याने अक्षरशः समस्त महाराष्ट्राला वेड लावले असून धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला ऐकताच तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक ठेका धरत आहेत.

सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस अशा सर्वच ठिकाणी एकाच गाण्याची चर्चा आहे. आता “ओsss शेठ…” असं म्हटलं की प्रत्येकजण “या पाहटं पाहटं…” , असं म्हणून भुरट्या शेठ लोकांना टोलवू लागले आहेत. तर हे गाणे आल्यापासून अनेक जणांची रखडलेली येणी तर दुकानदारांची उधारी चुकतीच झाली असल्याचे अनुभव अनेकांनी सांगितले आहेत. या गाण्याच्या ऑडिओ आणि व्हिडीओ दोन्हीही हटके स्वरुपात बनविण्यात आल्याने या गाण्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. एखाद्या व्यक्तीला टोलविण्यासाठी या गाण्याला सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामवर रिल्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत. नुकतेच इन्स्टा स्टार्स शुभम गायकवाड आणि मल्हारी उकळे यांनी या गाण्यावर थिरकत सर्व टीम ला शुभेच्छा दिल्या.
या गाण्याची निर्मिती थेरगाव येथील ‘द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन’, झेंडू फ्रेंड्स फिल्म प्रोडक्शन, आणि देवा फिल्म प्रोडक्शन यांनी केली आहे. तर उत्कृष्ठ असे दिग्दर्शन विनय सोनवणे यांनी केलेले आहे. या गाण्याचे गीतकार संभाजी बारबोले व राहुल समिंदर हे आहेत तर धुमाकूळ घालणारा आवाज गायक धीरज वानखेडे यांचा आहे. कॅमेरामन अमर चाकोटकर यांनी आपल्या जबरदस्त कौशल्यातून उत्कृष्ट अशी कलाकृती आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेत कैद केली आहे. गाण्याचे संगीत संभाजी बारबोले व आकाश साठे यांचे असून संगीत संयोजन आकाश साठे यांनी केले आहे.
विनय सोनवणे, राहुल समिंदर, संभाजी बारबोले, प्रसाद वडघुले, राहुल राजे, सोमनाथ बोरगावे, प्रशांत पाटोळे, गोविंद कांबळे, सागर पळशीकर, अजिंक्य बारणे, सागर गायकवाड, NX, अमित वाकोळे , किरण सोनवणे या कलाकारांनी आपल्या भूमिकेतून व अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त अशी छाप पाडली आहे.
तुषार नलावडे यांनी प्रोडक्शन सहाय्यक म्हणून काम केले आहे तर नयन देसाई यांचे ग्राफिक्स डिझाईन आहे. ‘झुंज न्यूज’ मीडिया पार्टनर आहेत. तर प्रमोद साखरे, प्रेम झेंडे, प्रशांत पाटोळे, अजिंक्य बारणे, शीतल मोरे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!