● फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व अण्णा भाऊ साठे विचार मंच सांगवी यांच्या वतीने नगरसेवक संतोष कांबळे यांना समाजमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांगवी, दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व आण्णा भाऊ साठे विचार मंच यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाचे निर्बंध पाळत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व अण्णा भाऊ साठे विचार मंच सांगवी यांच्या वतीने नगरसेवक संतोष कांबळे यांना समाजमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना ॲड.वसंत कांबळे म्हणाले,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील कष्टकरी समाजाला प्रबोधनातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. पृथ्वी हि शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. ही व्यवस्थेला जाणिव करून देण्याचे काम आण्णाभाऊंनी केले. आण्णाभाऊ दीड दिवस शाळेत गेले मात्र आण्णाभाऊंच्या साहित्यावर पीएचडी करावी लागते अशा वास्तववादी अगाध साहित्याचे ते जनक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिनिक्सचे योगेश कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महापुरूषांच्या विचारांचा वारसा समाजमनात जतन करत युवा पिढीला आदर्श घालून देणे गरजेचे आहे. प्रा.राजेंद्र जमदाडे, सागर झगडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी रविंद्र यादव,अमित बाराथे,राहुल विधाटे,यश ज्येष्ठ नागरिक संघाचे साहेबराव कांबळे, चंद्रकांत बाराथे, कैलास काटे, विक्रम कदम, निमिष कांबळे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!