पिंपरी,दि.२ ( puneetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शामभाऊ जगताप यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या हस्ते शामभाऊ जगताप यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशालीताई काळभोर, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, संदीप चिंचवडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शामभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदाच्या माध्यमातून विविध कामे केले आहेत. पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले. लॉकडाऊनमध्ये अनेकांना मदतीचा हात दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

जगताप यांनी केलेल्या या सर्व कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी शामभाऊ जगताप यांच्यावर आता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याही पदाला ते योग्य न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!