धानोरी,दि.५( punetoday9news):- पुणे शहरातील  विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील पिण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम झाल्यानंतर सदर खड्डे बुजविण्यात आले. मात्र खोदकामातील दगड व राडारोडा तसाच राहिल्याने अपघात होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. तसेच त्वरित या रस्त्यावरील दगड हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 

पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठं मोठे दगड व माती तसेच ठेवण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे अधिकच धोकादायक परिस्थिती निर्माण होवून  अनेक गाड्या दररोज घसरत असून अपघातास आमंत्रण दिल्याचा प्रकार होत आहे. अपघात झाल्याने वाहनचालकांचे नुकसान होत आहे.

त्यामुळे पुणे मनपा अधिकारी व ठेकेदारांनी त्वरित या विषयी लक्ष देऊन सदर रस्ता दुरूस्ती करून वाहतुकीसाठी पुर्ववत करावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती गणेश पाटील
यांनी दिली आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!