पिंपरी,दि.८( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय समतावादी पार्टी आणि शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सुनिता नगरकर यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती शारीरिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष मृदुला महाजन, कार्याध्यक्ष रफीक इनामदार ,सचिव महादेव फपाळ ,संचालक निवृत्ती काळभोर सर व मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर दलाल, उद्योजक बाळासाहेब नाकाडे ,सुरेश लिंगायत, अनंत शिंदाळकर , चंद्रकांत खोचरे ,सुधाकर कुंभार, सचिव अभिजीत हांचे, खजिनदार संगमेश्वर शिवपुजे ,सिद्धरमेश नवदगिरे, संतोष बिराजदार, शिवशरण बडदाळ, सिंधुताई नावदगिरे ,उद्योजक वैशालीताई घाटके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनीषा कलशेट्टी यांनी केले.
सध्याच्या करोनाच्या महामारीने समाजात अनेक लोकांना रक्ताची गरज आहे ही गरज लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत शिबिरात एकूण 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिरास काँग्रेस नेते दिलीप पांढरकर यांनी सदिच्छा भेट दिली. उद्योजक बाळासाहेब नाकाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिराचा योग घडवून आणणारे बसवेश्वर कनजे यांनी उपस्थितांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले.
Comments are closed