कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना हा ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडला आहे .
पिंपरी ,दि.९ :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी येथील क्रोमा सेंटर शेजारी कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.
दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यावेळी उपस्थितांनी सोसायटीचे चेअरमन यांना ही घटना कळवली. त्यामुळे तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ त्या ठिकाणी आपल्या टीम सोबत पोहचले. तोपर्यंत पुण्याहून बॉम्बनाशक पथक निघाले होते. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत
हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली असून हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.
Comments are closed