सांगवी, दि.९ ( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली.

पुरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या साहित्यात जीवनावश्यक वस्तु, भांडी, अन्नधान्य, कपडे, औषधे , बिस्किट,बाटलीबंद पाणी , फिनेल, साबन याचा समावेश होता.

पिंपरी-चिंचवड शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील कुंभार वाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव खांदाट, भोईवाडी, दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी, खेर्डी एम.आय.डि.सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी वाटप करण्यात आले व पुरग्रस्त विविध भागातील पाहणी करण्यात आली.

त्या प्रसंगी राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, तेजस दाते, सुरज जाधव, नितिन शिंदे, अविनाश तरडे, स्वप्निल महांगरे, प्रवीण माळी, निलेश ननावरे, भरत क्षेत्रे, आकाश जाधव, नारायण पठारे, निलेश पवार, रोहिदास शिवनेकर, मंगेश भालेकर, सतीष सामनगावे, समाधान केंद्रे, अविनाश एकंबे, श्रावण गोयल, श्रद्धा देशमुख, सोनाली गावडे, अभिषेक गावडे, सुभाष पाटिल, विपुल काळभोर, ओंकार काळभोर, रोहित भोकरे, जय सकट, प्रदीप घोड़के , प्रविण सोलंकी हे सर्व मदत करण्यासाठी उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!