पुणे,दि११( punetoday9news):- महावितरणच्या लातूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ . मोहन दिवटे लिखीत ‘ जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड मुंबई येथे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले .
यावेळी विजय सिंघल यांच्यासह संचालक ( संचालन) , संजय ताकसांडे , संचालक ( वित्त ) रविंद्र सावंत , संचालक ( प्रकल्प / मानव संसाधन ) भालचंद्र खंडाईत , कार्यकारी संचालक ( वाणिज्य ) सतिश चव्हाण , मुख्य महाव्यवस्थापक ( ता.आ. ) भरत जाडकर , मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे हे उपस्थित होते .
डॉ . मोहन दिवटे यांनी लिहिलेले ‘ जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे ‘ हे पुस्तक मुक्तरंग प्रकाशन लातूरतर्फे प्रकाशित करण्यात आले असून सदर पुस्तकास महाराष्ट्राचे राज्यपाल मा . भगत सिंह कोश्यारी आणि भारताचे माजी गृहमंत्री व पंजाब राज्याचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रस्तावना आहे .
या पुस्तकातून प्रारंभिक काळातील माध्यम सृष्टी , भारतीय माध्यम व्यवस्था , मराठी वृत्तपत्र सृष्टी , जनसंपर्क , महावितरणमधील जनसंपर्क विषयक चांगले उपक्रम आणि माध्यमांची भूमिका इत्यादी घटकांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे .
चांगली साहित्यकृती हे जनसंपर्काचे उत्तम साधन आहे , असे सांगतानाच डॉ . दिवटे यांनी लिहिलेले हे पुस्तक जनसंपर्काचा आदर्श नमूना आहे . त्यातून महावितरणच्या चांगल्या कार्यक्रमाची समाजाला ओळख होईल . महावितरणची प्रतिमा जनमाणसात उजाळली जाईल . भविष्यात अशीच चांगली साहित्यकृती डॉ . दिवटे यांच्याकडून निर्माण व्हावी , अशी अपेक्षा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क विभागाचे राहुल नाईक व इतरांनी परिश्रम घेतले .
Comments are closed