● नाशिक, मालेगाव, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, चेन्नई, दिल्ली, लखनौ अशा विविध शहरांत आज दुपारी साडेबारा वाजेपासून व्ही-आय कंपनीच्या ग्राहकांची सेवा विस्कळीत. 

● दोन्ही कंपन्या एकत्र येवूनही सेवेत अडथळे येत असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी. 

 

पुणे,दि.११( punetoday9news):-  मोबाईल सेवा पुरवणार्‍या वोडाफोन आणि आयडीया या कंपनीच्या देशभरातल्या ग्राहकांना आज दिवसभर सेवा विस्कळीत झाल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

नाशिक, मालेगाव, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, चेन्नई, दिल्ली, लखनौ अशा विविध शहरांत आज दुपारी साडेबारा वाजेपासून व्ही-आय कंपनीच्या ग्राहकांची सेवा बाधित झाली होती.

काही शहरांमध्ये इंटरनेट आणि फोन कॉल्स दोन्हीही बंद होते, तर काही ठिकाणी केवळ इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी भागीदार असलेल्या अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या बाहेर पडण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्यातच आज अचानक सेवा कोलमडल्याने ग्राहकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते.

तसेच अशा पद्धतीने विस्कळीत सेवेने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा फटका भविष्यात कंपनीला बसू शकतो.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!