मुंबई,  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांप्रमाणे तेजी कायम राहिली. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेंसेक्स 593.31 अंकांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा 55,437.29 अंकांवर बंद झाला.  तर निफ्टीमध्ये 164.70 अंकांनी वाढून 16,529.10 अंकावर पोहोचला. एकूणच गुंतवणूकदारांसाठी शुक्रवारही तेजीचाच ठरला.

गुरुवारी सेंसेक्स 54,874.10  वर तर निफ्टी 16,375.50  वर पोहोचला होता. काल सकाळी शेअर बाजाराची सुरुवातच तेजीने झाली. बाजार सुरु होताच सेंसेक्स 55 हजारच्यावर पोहोचला तर निफ्टीही 16,387.50 च्या विक्रमाकडे पोहोचला. जगभरात कोरोनाची ओसरत असलेली लाट पाहून गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्याकडे कल वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन दिवसांपासून सेंसेक्समध्ये वाढ होताना दिसत आहे. आयटी, बँकिंग, ऑटो आणि वीज कंपन्यांच्या शेअरमध्ये आज तेजी दिसली. सेंसेक्सच्या कंपन्यांमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चा शेअर तीन टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढला. दुपारी सेंसेक्स 55,487.79  या उच्च पातळीवर पोहोचला होता.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच निफ्टीनेही प्रथमच 16 हजारचा आकडा पार केला. निफ्टीमध्ये 164.70 (1.01 टक्के) वाढ झाली आणि तो 16, 529,10 या आतापर्यंतच्या सर्वात वरच्या स्तरावर बंद झाला. दुसरीकडे पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये घट झाल्याचेही चित्र दिसले.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!