फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपक्रम.
सांगवी, १५ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी गृहसंकुलांमध्येही स्वतंत्र भारताचा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळत राष्ट्रीय सण साजरा झाला .
यावेळी अध्यक्ष नगरसेवक संतोष कांबळे, प्रेरणा सहाणे, संतोष कांबळे, संजय जगताप, रवींद्र यादव, राहुल विधाटे, श्रीकांत चव्हाण, निमिष कांबळे, योगेश कांबळे, विक्रम कदम, नामदेव आरस्कर, मोहन जाधव , संदीप खोकराळे , प्रविण कांबळे, अविनाश कांबळे, सुनील कांबळे उपस्थित होते.
Comments are closed