पिंपरी ,दि.१५ (punetoday9news):- अखिल भारतीय जाणीव संघटनेच्या वतीने आयोजित ७५ व्या ध्वजारोहण करण्याचा मान आज तृतीयपंथी मोरा पाटील यांना देण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार अविनाश कांबळे, पर्वती मतदार संघाचे निरीक्षक रोहिदास तूपसोंदर , स्वराज्य संग्रामचे महेश लाड, उद्योजक मनोज कचरावत, धैर्यशील सूर्यवंशी तसेच भारतीय जाणीव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे रवींद्र कदम यांच्या अथक प्रयत्ना नंतर मिळालेली तृतीय पंथी लोकांना मतदान ओळखपत्रे वाटप करण्यात आली. जाणीव च्या वतीने नेहमीच वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात त्याचा भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वराज्य संग्राम चे महेश लाड म्हणाले की, “मूठभर लोकांचा समाजावरील सत्तेचा पगडा आता जुगारून देउन स्वतंत्र पणे जगण्याची वेळ आता आलेली आहे. हा देश राजगुरू, सुखदेव भगतसिंग यांच्या बलिदानाने स्वतंत्र झाला आहे, हा देश महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, आंबेडकर यांचा आहे.”
तसेच शीला डावरे म्हणल्या की, “काही मिळवायचे असेल तर संघर्ष अटळ आहे.” जाणीव संघटनेचे चौधरी सर यांनी सांगितले की, “आज पर्यंत संघटनेच्या वतीने सर्व सामान्य लोकांच्या साठी, फेरीवाले, पथारी वाले यांच्या साठी आम्ही तन-मन-धन देऊन संघर्ष उभा केलेला आहे आणि यापुढे देखील करत राहू.”
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राज्य समनव्यक फुलचंद पायाळ, चौधरी सर, रवी कदम, संघटक संदीप करडे,सतीश शहा,सुरेश दरवडे, सुरेश रणदिवे, सुरेश दर्वेकर, तोडकर, सोनावणे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed