पिंपरी, दि.१६ (punetoday9news) :- झील मिस महाराष्ट्र 2019 ची विजेती रिया मोहन हिने या मोठ्या यशानंतर हिंजवडी येथे झालेल्या ‘झील मिस इंडिया -2021’ मध्ये प्रथम रनरअप मिळवले. या यशानंतर तिने आपले स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच रितिका मोहन हिला ‘किशोर भारत 2021’ मध्ये ‘परफेक्ट स्माईल’ने गौरविण्यात आले. तिला हे यश पहिल्यांदाच मिळाले.


आपल्या या यशाबद्दल रिया मोहन म्हणाली, की मेहनत, सहनशक्ती आणि सातत्य यामुळेच ही महत्त्वाची भूमिका बजावता आली. माझ्या यशाद्वारे इतरांना नवनिर्मिती करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि प्रेरणा देण्याची इच्छा आहे. कलेच्या माध्यमातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि मी इच्छिते तसे व्हावे म्हणून मी माझे सर्वकाही देते. माझा विश्वास आहे की योग्य दृष्टीकोन आणि आत्मविश्वास हीच माझ्या विजयाची गुरुकिल्ली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांहून वेगळे करून दाखविण्यासाठी अतूट आत्मविश्वास बाळगला पाहिजे. परंतु नम्र असणे देखील तितकेच आवश्यक आहे.

 

 

 

 


Comments are closed

error: Content is protected !!