सांगवी,दि.१६(punetoday9news):- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्यदिन ऑनलाईन साजरा केला. यावेळी सर्व शिक्षकांनी देशभक्ती गीते गायली.
ध्वजारोहण अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरूणकर, हर्षा बांठिया, प्रिया मेनन, पर्यवेक्षिका आशा घोरपडे, नीलम पवार, सुरेखा क्षीरसागर, भटू शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed