● हा पुरस्कार सतीश लोहिया यांनी सांगवी परिसर महेश मंडळ माहेश्वरी समाज यांना समर्पित केला आहे.
सांगवी,दि.१६( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील सतीश लोहिया यांना सामाजिक कार्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भगवान बाबा बालिका आश्रम, औरंगाबाद यांच्याकडून ‘भगवानबाबा समाज भूषण पुरस्कार’ देण्यात आला.
सांगवी परिसर महेश मंडळ व कार्यकर्त्यांच्या सहयोगातून सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकीतून समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी,गरजवंतासाठी उल्लेखनीय असे उपक्रम राबवले आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसन भन्साळी, संयुक्त मंत्री संजय मंत्री , औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सतिश लढा आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed