पिंपरी,दि.१७( punetoday9news):- शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी, ग्रंथ हेच गुरु, शिकाल तर जगाल हे उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने औरंगाबाद येथील जय किशन शिक्षण संस्थेच्या भगवानबाबा बालक आश्रम शाळेला ८ संगणक (डेस्क टॉप) व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने भेट देऊन संगणक वर्ग चालू करण्यात आला .
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित संगणक शिक्षण सहज उपलबध होते . मात्र , मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेच्या तुलनेत संगणक साहित्याची कमतरता भासत असते. ठीक ठिकाणी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी चढाओढ चालू असते. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याच्या तुलनेत मराठी शाळेतील विद्यार्थी या तांत्रिक युगात टिकून राहण्यासाठी सांगवी परिसर महेश मंडळातर्फे व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने८ (आठ) संगणक (डेस्क टॉप ) भेट देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
समाजातील विविध संस्थांनी पुढे येऊन मराठी माध्यमातील शाळांसाठी अद्यावत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर हे विद्यार्थी हि स्पर्धेच्या युगात मागे राहणार नाहीत. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकिसन भन्साळी यांनी केले.
मागील एक वर्षांपासून विद्यार्थी सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेत आहेत, परंतु संस्थेकडे संगणक नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या . या संगणकांमुळे बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत च्या अडचणी सुटतील असे मत सचिव कविता वाघ यांनी मांडले .
या प्रसंगी सतीश लड्ढा, सी . एस. सोनी, संजय मंत्री,मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, सचिन मंत्री, गजानंद बिहाणी, विवेक झंवर आदी मंडळाचे सभासद उपस्थित होते
प्रास्तविक शाळेच्या सचिव कविता वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन घुगे यांनी केले.
Comments are closed