♦ जनता शिक्षण संस्थेचा संस्था वर्धापन दिन.
पिंपळे गुरव,दि.१७ ( punetoday9news ):- दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवर्य बाबुराव जगताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर, सहसचिव हेमंत बगनर, सहाय्यक सचिव रामेश्वर होनखांबे, मुख्याध्यापिका चारुशीला पाटील, राजश्री बिष्ट, प्रभारी प्राचार्य सोमनाथ दडस, उपप्राचार्य अंजली घोडके, पर्यवेक्षिका कल्याणी कुलकर्णी यांनी गुरुवर्य जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
संस्थेचे अध्यक्ष देवकर म्हणाले,
” पुण्याचे महापौर असताना गुरुवर्यांनी शुक्रवार पेठेतील आपल्या राहत्या घरापासून ते महापालिका भवन पर्यंत पायी चालत प्रवास केला. महापौरांचा साठी असलेले चार चाकी वाहन त्यांनी केवळ महापालिका प्रशासकीय कामांसाठीच वापरली.”
गुरुवर्य जगताप यांचा जन्मदिवस जनता शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापन दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष देवकर यांनी ध्वजारोहण करून केली व त्यानंतर संस्था गीत गाऊन उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनी ध्वजाला वंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय झराड यांनी केले व नियोजन गंगाधर पवार यांनी केले.
Comments are closed