शहरात मोठी खळबळ.

कारवाई कुणावर व कशासंदर्भात प्रश्न उपस्थित .

स्थायी समितीची बैठक असल्याने महापालिकेत ठेकेदारांचीही गर्दी. 

पिंपरी,दि.१८ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा मारला असून त्याची बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे .  महापालिकेत आज स्थायी समितीची बैठक संपताच एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला आहे. तर, एसीबी कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत व शहरात मोठी खबळबळ उडाली आहे.

आज स्थायी समितीची बैठक असल्याने महापालिकेत ठेकेदारांची देखील मोठ्या संख्येने गर्दी होती. दरम्यान, बैठक संपताच एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने, एकच खळबळ माजली . एसीबीने अचानकपणे टाकलेल्या या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एकच खळबळ उडाली. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी अचानकपणे स्थायी समिती कार्यालयात दाखल झाले. मनपाच्या इमारतीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास तासभरापासून एसीबीचे अधिकारी तेथील कागदपत्रांची तपासणी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या पीएला एसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुण्यातील कार्यालयामध्ये नेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!