पिंपरी ( punetoday9news ) :-  खडकी रेंजहिल्स हे पहिल्यापासून खेळाचे माहेरघर आहे आणि ते असेच कायमस्वरूपी राहील. मात्र, मुलांना मैदाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. फुटबॉलचे मैदान फुटबॉलसाठीच वापरले पाहिजे. क्रिकेटच्या सामन्यांमुळे फुटबॉल मैदानावर खड्डे पडल्याने फुटबॉल खेळाडू जखमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यावर क्रिकेटचे सामने खेळवू नयेत, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी अम्युनेशन फॅक्टरी प्रशासनाकडे केली आहे.


फुटबॉलप्रेमी मॅथूअण्णा यांनी नुकतेच फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी रामभाऊ जाधव यांनी ही मागणी केली. यावेळी नगरसेवक मनीष आनंद, 2016 च्या आयपीएल’मधील खेळाडू डाॅमनिक जोसेफ, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी प्रभाकर खरात, गोपी शनमुगम, बंडू कदम आदी उपस्थित होते.

रामभाऊ जाधव म्हणाले, की मुलांनी खेळाकडे लक्ष केंद्रीत करावे. आजच्या तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे; तसेच मैदानी खेळापेक्षा तरुणाई मोबाईलमध्ये अडकली आहे. तरुण पिढीने मोबाईल गेमपेक्षा मैदानी खेळात रमण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांना खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तरच सशक्त समाजाची निर्मिती होईल. त्या त्या खेळासाठी स्वतंत्र मैदान असायला हवे. त्यासाठी अम्युनेशन फॅक्टरी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!