● वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

पिंपरी,दि.२२( punetoday9news):- सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक अजय दुधभाते यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी बळीराम घोडके, संदिपान सामसे व कल्याण बोकडे यांची तर कार्याध्यक्षपदी सुधाकर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक पिंपळे गुरव येथे नुकतीच पार पडली. या बैठकीदरम्यान संघाचे संस्थापक व श्रमजीवी पतसंस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, अभिमन्यु गाडेकर, बाबासाहेब चितळकर, विनायक पिंगळे, मधुकर लंभाते, विजय हारनोळ, विजय वाघमोडे, माऊली खामगळ, मोहनराव पाटील, देवीदास फसके, नारायण मदने, सुनिल चौरे, सुखदेव चोरमले, संभाजी कोळेकर, दत्तात्रय घुले, सतिश कोकरे आदि वरिष्ठ मार्गदर्शक व सभासदांच्या उपस्थितीमध्ये संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संघाच्या सचिवपदी बिरु व्हनमाने, सहसचिवपदी गिरीष देवकाते, नवनाथ बिडे यांची खजिनदारपदी डॉ.दिनेश गाडेकर यांची तर प्रसिद्धीप्रमुखपदी महादेव मासाळ यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यांमध्ये

अशोक काळे, मनोजकुमार मारकड, निलेश गाडेकर,संतोष नारायण मदने, सुनिल पांढरे, वैजिनाथ सुरवसे, कृष्णराव गिरगुणे, ज्ञानेश्वर वाघमारे, अमोल होळकर, कल्याण कोकरे आदींचा समावेश आहे. दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या माध्यमातून सर्वांना सोबतीला घेऊन व एकजुटीने काम करत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष अजय दूधभाते यांनी सांगितले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!