सांगवी, दि.२३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार ज्ञानेश्वर टकले यांच्या मातोश्री पार्वती नामदेव टकले यांचे आज (सोमवार) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या.
पार्वती टकले यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्यांची प्रकृती मध्ये सुधारणा होत होती. मात्र, अचानक त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, आज सोमवार सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगवी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Comments are closed