औंध,दि.२४ ( punetoday9news ):- पुणे शहरातील औंध मधील जनता शिक्षण संस्थेतील श्री शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण असा उपक्रम साजरा करण्यात आला. मागील काही दिवसात आपण विविध रूपाने महिलांनी केलेली देशसेवा अनुभवली आहे. आरोग्य सेविका, महिला पोलीस , अधिकारी, सिस्टर्स यांनी कोविड काळात रात्रंदिवस आपले काम करून करोडो लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे फक्त पुरुषच रक्षण करतात हि संकल्पना मागे पडून स्री पुरुष समानता दिसून येते. तसेच महिलाही सक्षमपणे पुढे आल्या आहेत.
आजच्या काळातील बहीण भावांचे रक्षण व संरक्षण करते हे त्यांनी सिद्ध केले आहे .त्या बहिणींचा सुदधा सन्मान व्हावा यासाठी प्राचार्य राजू दिक्षित व पर्यवेक्षिका भारती पवार यांच्या संकल्पनेतून ” एक राखी बहिणीसाठी ” हा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. या उपक्रमात सहभागी होऊन विदयार्थ्यांनी भरगोस असा प्रतिसाद दिला .
प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी व सांस्कृतिक विभाग प्रमुख बिपीन बनकर, गायत्री देशमुख, कांचन घुले, सुधाकर कांबळे , मिनल घोरपडे, अशोक गोसावी, महेश आगम व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी हि संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
Comments are closed