आज भारतात प्रवासात सर्वात जास्त प्रवासी व वाहन चालक गुगल मॅप चा वापर करतात. यात नावीण्य आणत गुगलने रस्त्यांवरील टोलची माहिती रकमेसह देण्याचे नवे फीचर आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरच आता ॲपमध्ये मॅप सोबत टोलची रक्कमही दिसू शकणार आहे.
रस्ता शोधणे , कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे , याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते . त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात .
प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल , याची माहिती मिळेल . कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे . आधीपासूनच गुगल मॅप देशातील मार्गांवरील टोल ओळखतात आणि दाखवतात .मात्र आता टोलची अंदाजे रक्कमही समजणार असल्याने चालकांना प्रवासाचे व खर्चाचे नियोजन करता येईल.
Comments are closed