दापोडी,दि.२८ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती सी.के.गोयल कला व वाणिज्य महाविद्यालय व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने फिट इंडिया अंतर्गत दि . २४ व २५ ऑगस्ट २०२१ रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील ६५० अभ्यासकांनी वेबिनारकरीता नोंदणी केली होती .
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेबिनारची सुरवात झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पोपटराव देवकर हे होते . तर राजू भावसार, अर्जुन पुरस्कार कबडडी खेळाडू , मुंबई ( भारत ) व डॉ . दीपक माने , डायरेक्टर शरीरिक शिक्षण व क्रीडा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
प्रा. डॉ. शेजवळ बी. आर . मानसशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ( भारत ) यांच्या बीज भाषणाने झाली . पहिल्या दिवशी प्रा. डॉ . कौकाब अझीम ( सौदी अरेबिया ) यांनी वेबिनारला मार्गदर्शन केले . योग आणि मानसिक संतुलन यादृष्टीने उपयुक्त अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली . दुसऱ्या दिवशी प्रा . डॉ . नतालीया सोल्वेय ( अर्जेन्टिना ) व डॉ . मनमथ घरोटे लोणावळा ( भारत ) यांनी मार्गदर्शन केले .
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचा समारोप जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी प्रा. सुभाष गारगोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . या वेबिनार व्याख्यानासाठी प्राचार्य डॉ. सोपान कांगणे , प्रा. डॉ. दीपक शेंडकर , प्रा. डॉ . महेश देशपांडे यांनी अध्यक्षस्थान भुषविले . सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. माया माईनकर व डॉ . शिरोडे डी. बी . यांनी केले . कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ . विकास पवार यांनी केले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. विकास पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शोभा शिंदे , प्रा. शकूर सय्यद , प्रा. विद्या पाठारे , प्रा . समीर पवार , प्रा.पी. जी . शिंदे , डॉ. सोमनाथ दडस , डॉ . स्वाती काळभोर , महाविद्यालयाचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले . या संपूर्ण वेबिनारचे आयोजन कीडा विभाग प्रमुख डॉ. शोभा शिंदे यांनी केले .
या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले . यासाठी मनिष भगत यांचे तांत्रिक सहकार्य लाभले
Comments are closed