पुणे, दि.२९( punetoday9news):-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहातील बंद दालनात १५ मिनिटे चर्चा झाली होती.ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती . त्यानंतर ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती . आता हीच चर्चा सर्वात अधिक चर्चेचा विषय बनत आहे. 

प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले , “ हे खरच आहे . ती चर्चा सगळ्यांसमोर झाली आहे, ती काय लपून छपून झाली नाही . त्या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकीच्या नंतर हॉलच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे . तिथे दहा मिनटं आम्ही चर्चा केली , ती चर्चा देखील ओबीसी आरक्षणाबाबतच होती. जे बैठकीत झालं त्याबाबत मी काही मत बैठकीत मांडलं होतं , ते मी पुन्हा त्यांना सांगितलं की , अशा प्रकारे आपण केलं तर तीन – साडेतीन महिन्यात आपण ओबीसींचं राजकीय आरक्षण परत करू शकतो . त्यावर ते म्हणाले तुम्ही सहकार्य करा , मी म्हणालो आम्ही संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत . याव्यतिरिक्त काही आमची चर्चा झालेली नाही.

मात्र यापूर्वी अनेक पक्षांच्या प्रमुखांच्या भेटीत बंद दाराआड चर्चा ह्या राजकीय गणिते व भविष्यातील समीकरणे ठरवण्यासाठी होतात हे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे ही बंद दाराआड झालेली चर्चा ओबीसी आरक्षणासोबत अन्य कोणती चर्चा झाली हे भविष्यातील घडामोडीवरूनच समोर येईल.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!