पिंपरी,२९ ऑगस्ट २०२१ – कोरोनामुळे पतीचे निधन झाल़्याने वैधव्य आलेल्या महिलांचे समुपदेशनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
उमेद जागर उपक्रमा अंतर्गत महिलांचे समुपदेशन करणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधणे तसेच कौशल्य विकास वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण देणे व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमेद जागर’ उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचे संपुर्ण नियोजन व अंमल बजावणी नागरवस्ती विभागामार्फत करण्यात येणार आहे.
Comments are closed