पिंपरी,दि.३०( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक शिक्षिका व खेळाडू यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पांढरकर, प्रमुख पाहुणे फिरोज शेख, राज पाटील, सूर्यकांत मुळे, निवृत्ती काळभोर, गणेश मगर, भुजंग दुधाळे उपस्थित होते.
फिरोज शेख यांनी क्रीडा शिक्षकाला खेळाडू घडविताना किती परीश्रम घ्यावे लागतात यावर प्रकाश टाकुन विजेत्यांचे अभिनंदन केले. सूर्यकांत मुळे यांनी निरोगी आयुष्या साठी खेळाचे किती महत्त्व आहे याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बसवराज कनजे यांनी सत्कार करण्यामागील उद्देश हा मेहनती क्रीडापटुंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे असे सांगितले
विशेष बाब म्हणजे यावेळी क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामधे सहभागी झालेल्या रक्तमित्रांचाही सत्कार करण्यात आला.
यामध्ये निलखंड कांबळे, सिमा चव्हाण, यश जाधव, प्रशांत रणखांबे, स्नेहा कुदंप, ऋचा पाचपांडे, बाळासाहेब हेगडे, उमा काळे, ईश्वरी फपाळ, गजानन आळगड्डे, रेणू शर्मा, सुष्टी सरमाने, निखिल पवार, संपदा कुंजीर, स्तुती हुद्रे या पुरस्कारार्थींचा समावेश होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी अनंत सिंदाळकर, विलास शेटकार, सिध्दु नावदगेरे, संगमेश्वर शिवपुजे, चंद्रकांत खोचरे, अभिजित हांचे, शिवानंद घाटके आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे कदम, माळी राजकुमार, हर्षदा नळकांडे, मनिषा पाटील यांनी विशेष कार्य केले.
कार्यकमाचे सूत्र संचलन महादेव फपाळ व सुनिता नगरकर यांनी केले तसेच सुधाकर कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments are closed