● प्रदुषण टाळा, निसर्ग सांभाळा.

● माझा मास्क, माझी सुरक्षा.

● प्रेम करू वृक्षावर, मात करूया प्रदूषणावर.

● निसर्ग माझी माता, मीच तिचा रक्षण कर्ता.

● पर्यावरणाला वाचवूया, हेच अभियान चालवूया.

घोषणेतून पुस्तक दहीहंडी उपक्रम साजरा.

पिंपळे गुरव, दि. १( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील कामगार वस्ती मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तक रूपी दहीहंडी हा उपक्रम राबवण्यात आला. 

आज कोरोनाने थैमान घातले असताना संपूर्ण महाराष्ट्रात सण समारंभ साजरे करताना निर्बंध घालण्यात आले आहेत तसेच नागरिकांनीही सामाजिक बांधिलकीतून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने सण साजरे न करता सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जपण्यासाठी तसेच नवी विचारधारा रूजवण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांनी पुस्तक दहीहंडी उपक्रम राबवला.

कामगार वस्ती मधील गरीब, कष्टकरी समाजातील मुलांना पुस्तकी ज्ञान मिळावे . शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. हा हेतू ठेवून उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपस्थित मुलांना पुस्तक वही वाटण्यात आले.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!