● सोसायटीत सीसीटीव्ही हवाच , महत्त्व अधोरेखित.
● १०० नंबर क्रं. उचलला गेला नाही ; संकटकाळी नागरिकांनी संपर्क साधायचा कुठे प्रश्न उपस्थित.
● पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मात्र दाखवली तत्परता.
नवी सांगवी ,दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी परिसरातील आरती अपार्टमेंट मध्ये आज पहाटे चोरट्यांनी प्रवेश केला मात्र रहिवाशांनी दाखवलेल्या समय सूचकतेने चोरट्यांनी माघारी धूम ठोकली.मात्र सांगवी पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या साई चौक ते फेमस चौक दरम्यान पोलीस स्टेशन पासून ५ मिनिटांच्या अंतरावर चोरट्यांनी केलेले धाडस सांगवी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
सदर घटनेत पहाटे ३.३५ वा. आरती अपार्टमेंट मध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या देवगावकर यांच्या दाराची बेल वाजली व चोरट्यांनी देवगावकर यांना अनोळखी महिलेच्या नावाने माहिती विचारली. आपणास अशा महिलेची काही माहिती नसल्याचे सांगूनही चोरटा त्यांना घराबाहेर या असे धमकवू लागला.
त्यामुळे त्यांनी घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला. जोरजोरात मदतीसाठी ओरडल्याने सोसायटीतील इतर सदस्यांना जाग आली. त्यातील रहिवाशी असलेल्या पत्रकाराने मदतीसाठी १०० क्रंमाकावर संपर्क साधला पण दोन वेळा संपर्क साधूनही फोन उचलला गेला नाही. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील जी.जे. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यास तत्परतेने प्रतिसाद देत पेट्रोलिंग टीम पाठवण्यात आली मात्र पोलिसांच्या भीतीने चोरट्यांनी धूम ठोकली.
घडलेल्या प्रकारात सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरट्यांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असेही बोलले जात आहे.
Comments are closed