नवी सांगवी, दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी परिसरातील साई चौक ते पाण्याची टाकी या रस्त्यावर दुतर्फा बस पार्किंग होत असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत होता.त्यामुळे प्रशासनाने तात्पुरते दुभाजक टाकले आहेत मात्र दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्यास वारंवार अपघात होत आहेत. 

 

या अपघातांमुळे हे सिमेंटचे दुभाजक अस्थाव्यस्थ स्वरुपात पडलेले आहेत . यांना रंग नसल्यामुळे वारंवार अपघातांचे प्रमाण वाढत आहे . तसेच वाहने दुभाजकावर चढल्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता आहे . दि . २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८ च्या सुमारास १५ ते २० मिनीटाच्या अंतराने या ठिकाणी ३ अपघात झाले आहेत.

त्यामुळे सदर दुभाजक काढून टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरेश सकट, राजू सावळे यांनी महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागाकडे केली आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!