सांगवी, दि. २( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षक आणि तोतया बँक मॅनेजरला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे .

दि . 31 रोजी रात्री सृष्टी चौक येथे यांना अटक करण्यात आली . बुद्धभूषण अशोक कांबळे ( वय 27 , रा . म्हेत्रे वस्ती , टॉवर लाईन , निगडी ) , औदुंबर भारत जाधव ( वय 29 , रा . कासारवाडी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . याबाबत पोलीस नाईक प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी पोलीस नाईक सांगवी परिसरात मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करत होते . त्यावेळी सष्टी चौकातील एका पान टपरीवर दोघेजण संशयितपणे थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले . त्याती एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले तर एकाने एसबीआय बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले . प्रत्यक्षात दोघेही त्या पदावर नाहीत.चौकशीत आरोपींची तोतयागिरी पोलिसांनी उघडी पडल्याने त्यांना ताब्यात घेतले . एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता . तर दुसऱ्याने एसबीआय बँकेचा ड्रेस कोड परिधान केला होता .

दोघे आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाऊन दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होते . पोलिसांनी दोघांना अटक केली आहे . पोलीस उपनिरीक्षक येडे तपास करीत आहेत .

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!