पुणे,दि.२( punetoday9news):- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या 44 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सध्या कोरोना काळामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रत्येक विभागामध्ये व जनरेशन प्लांट मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .


प्रत्येक विभागात रक्तदान करण्याचे योजण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पिंपरी विभाग यांच्या मार्फत महावितरण पिंपरी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दि.१ रोजी 22/11 मोरवाडी म्हाडा सबस्टेशन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले . सदर रक्तदान शिबिरामध्ये ५१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे दत्तात्रय साळी कार्यकारी अभियंता महावितरण पिंपरी विभाग व गणेश चाकूरकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण पिंपरी विभाग यांच्या हस्ते फीत कापून, दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी शिवणेचारी उपाध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पुणे झोन हे होते. कार्यक्रमावेळी ससून हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ. सौरभ कुसुरकर यांचा सत्कार करण्यात आला.  सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्र व HT टेस्टर भेट देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरामध्ये ५१ राक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल संघटनेचे पिंपरी विभागीय अध्यक्ष संजय जोगदंड व संतोष खताळ सचिव पिंपरी विभाग यांचा डॉ सौरभ कुसुरकर ससून रक्तपेढी यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला .
कार्यक्रमात दत्तात्रय साळी, गणेश चाकूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवणेचारी यांनी उपस्थित रक्तदात्याना व कर्मचाऱ्यांना संबोधित करत आपण सर्वजण समाजाच एक देणे लागतो आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले तर गरीब व गरजू लोकांना त्याचा फायदा होईल व यामुळे नक्कीच एखाद्याचा जीव वाचू शकेल ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

आभार प्रदर्शन श्रीकांत टाक संघटक पिंपरी विभाग यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!