मुंबई( technology):- तुम्हाला जर तुमचा स्मार्टफोन , लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यावर दैनंदिन काम करायचे आहे तर याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही . ही साधने योग्यरित्या वापरली न गेल्यास काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल . बऱ्याचदा संगणकामध्ये बराच (Junk Files ) उपयुक्त नसलेला डेटा साठवला जातो . ज्यामुळे पीसी असू देत किंवा लॅपटॉप , स्मार्टफोन तो हँग तर होतोच सोबतच तो स्लो हो बरेचदा आपण याकडे लक्ष देत नाही , आणि या साधनांमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते . पण असे न करता अगदी पटकन आणि अगदी सोप्या पद्धतीने या जंक फाइल्स कशा डिलीट करायच्या ते पाहूया .

1. सर्वप्रथम Start Menu वर जा .

2 . तिथे cmd टाइप करताच तुम्हाला Cammand Prompt window चा पर्याय समोर दिसेल . तो पर्याय उघडा .

3 . त्यानंतर तात्पुरत्या फाइल्स तपासण्यासाठी , Cammand Prompt window जाऊन %SystemRoot % explorer.exe % temp % हा कोड तिथे प्रविष्ट करा .

4. आता सर्व प्रकारच्या जंक फाइल्स तुमच्या समोरील स्क्रीन वर येतील . नंतर ctrl + A दाबून त्या सर्व फाइल्स सिलेक्ट करा .

5. हे केल्यानंतर त्या सर्व फाइल्स डिलीट करून NEXT टाका .

6 . याऐवजी जर तुम्हाला कोणत्याही इतर मार्गाने जंक फाइल्स डिलीट करायच्या असल्यास cleanmgr / verylowdisk / e ही कमांड तुम्हाला वापरता येईल .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!