जेजुरी,दि.४( punetoday9news):- जेजुरीत दरवर्षी सोमवती अमावस्येला श्री.खंडोबा मंदिर व श्री.कडेपठार मंदिरात दर्शनाला लाखो भाविक येतात. मात्र यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवती अमावस्येला मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यासंदर्भात पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी आदेश जारी केला आहे.
त्यानुसार दरवर्षी सोमवतीला महाराष्ट्रातून सुमारे १ ते २ लाख भाविक येत असतात . दि .४ रोजी शनिवार व दि .५ रोजी रविवार अशी दोन सुट्टीचे दिवस असल्याने तसेच दि ०६ रोजी सोमवती अमावस्या असल्याकारणाने जेजुरीत खूप गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. सदर ठिकाणी सोशल डिस्टिंगचा फज्जा उडू शकतो व त्यातून जेजुरी शहरात मोठया प्रमाणावर कोरोना संसर्ग व फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही . याकरिता खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश देत आहे .
१ ) दि .४ /०९/२०२१ ते ६ /०९ /२०२१ रोजी पर्यंत खंडोबा मंदिर जेजुरी व कडेपठार मंदिर जेजुरी येथे भाविकांना शासकिय आदेशानुससार मंदीर बंद असलेने परिसरात गर्दी करु नये . तसेच त्याकरिता संबंधित देवस्थान आवश्यक त्या उपाय योजना ठेवतील .
२ ) जेजुरी येथील कोणतेही रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीने , रस्त्यावर , गल्लोगल्ली इ . ठिकाणी संचार , वाहतुक , फिरणे , उभे राहणे , थांबुन राहणे , रेंगळणे सर्व कृत्यांना मनाई करणेत आहे .
३ ) सदर कालावधीत जेजुरी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठवणेत येत आहे .
४ ) सदर कालावधीत जेजुरी शहर व परीसरात बाहेरुन आलेल्या कोणत्याही भाविकांना हॉटेल / लॉजेस मध्ये मुक्कामासाठी ठेवणार नाहीत अगर बुकींग घेणार नाहीत.
५ ) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात येत आहे .
६ ) सार्वजनिक कार्यक्रम , सवादय , मिरवणका , पालख्या काढता येणार नाहीत .
७ ) आजुबाजुच्या पंचक्रोशीतील लोकांना वरील कालावधीत जेजुरी शहर व परीसरामध्ये येण्यास या आदेशान्वये बंदी घालणेत येत आहे.
Comments are closed